अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर खरेदी करा मनपसंत घर ! श्लोक रिद्धी । श्लोक सिद्धी

सुंदर आणि आलिशान घर म्हणजे असं ठिकाण जिथे मनाला मिळते शांतता, विश्रांती. जिथे असतो कुटुंबाच्या स्नेहाबरोबरच आधुनिक सुखसुविधांचा संगम. छत्रपती संभाजीनगरसारख्या अतिशय वेगाने विकसित होणाऱ्या शहरात आपलंही स्वतःचं छानसं घर असावं, असं स्वप्न अनेक कुटुंबांच्या मनात असतं. अनेकांना फायदेशीर गुंतवणुकीसाठी घर किंवा फ्लॅटची खरेदी करायची असते. भविष्यात उत्पन्नाचा एक मोठा स्रोत म्हणून ते गृहखरेदीकडे पाहत असतात. अशा सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी अशी की, तुमचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तुम्हाला आवडेल अशा तुमच्या स्वप्नातील घराची खरेदी करण्यासाठी येत आहे अक्षय तृतीयेचा शुभमुहूर्त. होय, छत्रपती संभाजीनगरच्या प्राईम लोकेशनवर म्हणजेच चिकलठाणा एअरपोर्टसमोरच्या पॉश वसाहतीत श्लोक रिद्धी व श्लोक सिद्धी या गृहप्रकल्पांमध्ये मनासारखं सुंदर घर घेण्याची हीच सुवर्णसंधी आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रात नावाजलेल्या श्लोक रिअल्टीज ग्रुपचे हे सर्वांग सुंदर घरांचे प्रकल्प छत्रपती संभाजीनगर शहराची शान ठरले आहेत. इथे कुटुंबांना घेता येतो अलिशान सुखी जीवनाचा अनुभव. श्लोक रिद्धी व श्लोक सिद्धी या गृहप्रकल्पांमध्ये तुम्हाला मिळतील प्रशस्त आणि सुखसुविधांनी सज्ज असलेले २ बीएचके फ्लॅट्स आणि शानदार ४ व २ बीएचके रोहाऊसेस. या दोन्ही गृहप्रकल्पांना महारेराची मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे तुम्ही अगदी टेन्शन फ्री होऊन स्वतःच्या घराची चॉईस करू शकता.
श्लोक रिद्धी व श्लोक सिद्धी या गृहप्रकल्पांमध्ये प्रत्येकाला मिळते स्वतःची मोठी स्पेस. अलिशान घरांमध्ये प्रशस्त रूम्स, मोठा प्रशस्त हॉल आणि तितकीच सुंदर बेडरूम हेही आणखी एक वैशिष्ट्य आहे. फ्लॅट असो किंवा रोहाऊस येथे मिळतो भरपूर सूर्यप्रकाश, निसर्गाचे सानिध्य आणि मोकळी हवा. घरांची रचना करताना श्लोक रिअल्टीज ग्रुपने वास्तु सौंदर्याला अधिक प्राधान्य दिले आहे. घराच्या सजावटीसाठी आधुनिक वास्तुकला आणि इंटिरियर डिझाइनचा वापर केला आहे. त्यामुळे घराला एक आकर्षक आणि सुंदर रूप येते. उच्च दर्जाचे स्टील, सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्य वापरून प्रकल्पाची निर्मिती केली आहे. घराच्या बांधकामात आणि सजावटीत सर्वोत्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तुमच्या जीवनात गृहखरेदीचा अपूर्व योग आला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात जालना रोडवर असलेले श्लोक रिद्धी आणि श्लोक सिद्धी हे दोन्ही प्रकल्प म्हणजे तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारे आहेत. कुटुंब जीवनाला सुख-समाधान आणि समृद्धीचे वरदान देणारे हे दोन्ही गृहप्रकल्प निश्चितच तुमच्या पसंतीस पडतील. श्लोक रिद्धी आणि श्लोक सिद्धीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्राईम लोकेशन. त्यामुळे इथल्या घरात तुम्हाला मिळते संपूर्ण शहराशी बेस्ट कनेक्टिव्हिटी. कुठेही पोहचायचे असेल तर अगदी काही वेळात वाहतुकीच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. सतत वाहणाऱ्या जालना रस्त्याला लागूनच तुमचे घर असल्याने तुम्ही अगदी काही वेळात तुमच्या इच्छित ठिकाणी पोहचू शकता. श्लोक रिद्धी व श्लोक सिद्धी या गृहप्रकल्पांपासून शाळा-कॉलेजेस, शॉपिंग मॉल्स, करमणुकीची ठिकाणे, मार्केट, हॉस्पिटल्स, बाजारपेठ सर्व काही अगदी जवळ आहे.
ठरलं तर मग…! आजच श्लोक रिअल्टीजच्या श्लोक रिद्धी व श्लोक सिद्धी या गृहप्रकल्पांना सहकुटुंब भेट द्या आणि अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तुमच्या मनातले स्वतःच्या घराचे स्वप्न करा. सुखमय, आनंदी आणि सुविधापूर्ण कुटुंब जीवनाच्या तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा ! अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुमचे स्वप्न साकार होवो, हीच सदिच्छा !
अधिक माहितीसाठी आजच कॉल करा : +9188888 85149, +9188888 85150