गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गृहप्रवेश करा नव्या सुंदर घरात ! श्लोक रिद्धी । श्लोक सिद्धी

भारतीय सण आणि उत्सवांच्या परंपरेत दरवर्षी साधारण इंग्रजी कॅलेंडरनुसार मार्च किंवा एप्रिल महिन्यात येणारा सण म्हणजेच गुढीपाडवा. हिंदू धर्मात या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे, कारण याच दिवशी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे नवीन वर्षाला सुरुवात होते. गुढीपाडवा हा भारतीय लोकांचा आवडता सण असून, तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला सर्वत्र साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे, त्याचबरोबर कुठल्याही मोठ्या खरेदीसाठी खासमखास आहे. हिंदू परंपरेत सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा. या दिवशी मोठी खरेदी केली जाते, जसे की घर, फ्लॅट, रोहाऊस, बंगला किंवा आलिशान कार. सोने-चांदी आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी देखील गुढीपाडवा अतिउत्तम समजला जातो. तुम्हीही काही तरी नवीन खरेदी करायचे नक्कीच ठरवले असणार ! आपल्या वेगाने विकसित होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरात तुम्ही नवीन घर घेण्याचे स्वप्न पाहत असाल, तर यंदाचा गुढीपाडवा सण तुमची स्वप्नपूर्ती करणारा ठरणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. छत्रपती संभाजीनगरातील नामांकित बांधकाम समूह श्लोक रिअल्टीज तुमच्यासाठी घेऊन येत आहे घर खरेदी करण्याचे सुंदर ऑप्शन ! श्लोक रिद्धी आणि श्लोक सिद्धी. शहरातील पॉश परिसर, मुख्य रस्त्यालगत असलेल्या सुंदरशा घरामध्ये तुम्ही सजवू शकता आनंदी जीवनाची सुखस्वप्ने ! एअरपोर्टसमोर, चिकलठाणा भागात श्लोक रिद्धी व श्लोक सिद्धीमध्ये तुमच्यासाठी आहेत सर्वोत्तम लोकेशनवर लक्झरियस 2 बीएचके फ्लॅट्स आणि 4 व 5 बीएचके अल्ट्रा मॉडर्न रो-हाऊसेस. हे दोन्हीही गृहप्रकल्प म्हणजे सुखी कुटुंबांचं मनासारखं वास्तुशिल्प आहेत.
स्वतःच्या घरात उभारूया विजयाची गुढी !
भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस. नव्या घराच्या खरेदीने तुमच्या आनंदी जीवनाची सुरुवात करण्यासाठी गुढीपाडवा हा दिवस अगदी उत्तम आहे. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते, तुम्हीदेखील आता स्वतःच्या घरात विजयाची गुढी उभारण्यासाठी सज्ज व्हा आणि आजच एअरपोर्टसमोर, चिकलठाणा भागात श्लोक रिद्धी व श्लोक सिद्धी या सर्वांगसुंदर गृहप्रकल्पांना सहकुटुंब भेट देऊन घराची खरेदी निश्चित करा.
शुभमुहूर्तावर गृहखरेदीचा आला आहे शुभयोग
रिअल इस्टेट क्षेत्रात गुढीपाडवा निमित्ताने अनेक हालचाली होताना दिसतात. या काळात मिळणाऱ्या विविध आकर्षक ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही साकार करू शकता तुमचे गृहस्वप्न. लाडक्या कुटुंबाच्या स्वप्नाची पूर्तता करण्याचा, नवीन आनंदी जीवनास प्रारंभ करण्याचा शुभयोग आता तुमची प्रतीक्षा करीत आहे. यंदाच्या गुढीपाडव्याला नवीन घरात गृहप्रवेश करण्याची मोठी संधी तुम्हाला श्लोक रिद्धी व श्लोक सिद्धी या गृहप्रकल्पांच्या रूपाने लाभत आहे. संपूर्ण वर्षभरात गृहखरेदीसाठी गुढीपाडव्यासारखे दुसरे शुभमुहूर्त नाही. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुखस्वप्नांकडे वाटचाल करण्याचा, आपल्या कुटुंबाला अनोखी भेट देण्याचा हा उत्सव आहे. यानिमित्ताने गृहखरेदीचा अपूर्व योग आला आहे. शहरात जालना रोडवर चिकलठाणा एअरपोर्टसमोर श्लोक रिद्धी आणि श्लोक सिद्धी उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण बांधकामातून साकारलेले गृहप्रकल्प आहेत. कुटुंब जीवनाला सुख-समाधान आणि समृद्धीचे वरदान देणारे हे दोन्ही गृहप्रकल्प निश्चितच तुमच्या पसंतीस पडतील. प्राईम लोकेशन हे श्लोक रिद्धी आणि श्लोक सिद्धीचे अनोखे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे इथल्या घरात तुम्हाला मिळते संपूर्ण शहराशी बेस्ट कनेक्टिव्हिटी. जालना रस्त्याला लागूनच तुमचे घर असल्याने तुम्ही अगदी काही वेळात तुमच्या इच्छित ठिकाणी पोहचू शकता. मुलांची शाळा असो किंवा कॉलेज, शॉपिंग मॉल्स असो की मार्केट, हॉस्पिटल्स, शॉप्स – शोरूम्स येथून अगदी जवळ आहे. श्लोक रिद्धी व श्लोक सिद्धी येथे गृहखरेदी सगळ्याच दृष्टीने सोयीची आहे. चला तर मग, आजच श्लोक रिद्धी आणि श्लोक सिद्धी या गृहप्रकल्पांना सहकुटुंब भेट द्या व साकार करा तुमच्या कुटुंबाचे सुखस्वप्न.
अधिक माहिती व घराच्या बुकिंगसाठी कॉल करा – +9188888 85149