स्वतःचे घर खरेदी करताय? मग अवश्य जाणून घ्या या गोष्टी

स्वतःच्या घराची खरेदी हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय आणि त्यानंतर आयुष्यात शुभयोग येतो तो विवाहाचा. दोनाचे चार हात होतात आणि सोबतच जबाबदाऱ्याही वाढतात. यादरम्यान नवनवीन सुखस्वप्ने देखील खुणावत असतात. त्यातील सर्वात मोठं स्वप्न म्हणजे स्वतःचं घर घेण्याचं. नोकरी-व्यवसायात दीर्घकाळ परिश्रम केल्यानंतर घर खरेदी हा महत्त्वाचा निर्णय असतो. त्यामुळेच की काय, घर खरेदी करताना प्रत्येक कुटुंब विविध अंगांनी विचार करते आणि मगच निर्णय घेते. घर खरेदी ही आयुष्यभराची खरेदी असते. खरेदी केलेल्या घरात कुटुंबाला आनंद मिळावा, सुखसुविधा असाव्यात, मुलामुलींना शाळा-महाविद्यालयात जाणे सोपे व्हावे, आपले एकंदरीत कुटुंब जीवन आनंदात जावे, हाच प्रत्येकाचा हेतू असतो. छत्रपती संभाजीनगर शहरात जर तुम्ही गृहखरेदी करू इच्छित असाल, तर श्लोक रिअल्टीजचे मनमोहक गृहप्रकल्प तुमच्यासाठी अगदी योग्य ठरतील.
स्वतःचे घर खरेदी करताना किंवा फ्लॅट, रोहाऊस बुक करताना काय काय काळजी घ्यावी, कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हे आज आपण येथे जाणून घेणार आहोत. पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या कुटुंबांना या टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील. गृहखरेदीपूर्वी प्रत्येक कुटुंबाने काळजीपूर्वक नियोजन करून चांगल्या सर्व दृष्टीने परिपूर्ण अशा आपल्या बजेटमधील घराचा शोध घेऊन मग नंतरच पुढील पावले उचलावीत. घाई गडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नये. घरातील सर्व सदस्यांच्या अपेक्षा काय आहेत, घर ते शाळा, घर ते ऑफिस हे अंतर किती आहे, सर्वांना सोयीस्कर होईल असे घराचे क्षेत्रफळ आहे का, घराचे बांधकाम कुठल्या दर्जाचे आहे, घराची सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत का, असे अनेक प्रश्न स्वतःला विचारा आणि त्यांची उत्तरे जाणून घ्या, या सर्व प्रश्नांना योग्य समर्पक उत्तर मिळाले असेल तरच बुकिंग किंवा खरेदी निश्चित करा.
या आहेत काही उपयुक्त टिप्स :
* घराची खरेदी करताना आपल्या कुटुंबियांच्या गरजा आणि बजेटचा विचार अवश्य करावा. विनाकारण भलेमोठे गृहकर्ज घेऊन मोठ्या घराची खरेदी केली तर तर ती तुम्हाला भविष्यात जड जाऊ शकते. त्यामुळे नेहमीच आपल्या बजेटचा विचार करा.
* आपल्या कुटुंबाचा आकार आणि गरजा पाहूनच घर निश्चित करावे. आपल्या कुटुंबाला किती खोल्यांची गरज आहे? घरातील लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आहे का, स्वतःचा व्यवसाय असेल तर भविष्यात तुम्ही तिथे ऑफिस उभारू शकता का? वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा आहे का, हे सगळे बघणे गरजेचे आहे.
* घराच्या खरेदीसाठी सर्वात आधी तुमचे स्वतःचे बजेट ठरवा. घराच्या खरेदीवर तुम्ही किती पैसे खर्च करू शकता, याचा विचार करा. त्यानुसार पुढील पाऊले उचला. घराच्या खरेदीसाठी तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असल्यास, त्याचा मासिक हप्ता तुम्हाला परवडेल का हे आधी तपासून घ्या.
* तुम्ही ज्या घराची बुकिंग करीत आहात, त्याची नीट पाहणी करा. घराची रचना आणि बांधकाम स्थिती, आतील आणि बाहेरील भिंतींची मजबुती, स्लॅबचे बांधकाम, पाणीपुरवठा व्यवस्था, लाईट फिटिंग, प्लंबिंग, फर्निचर क्वालिटी या सर्वच गोष्टींची बारकाईने तपासणी करा.
* सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही खरेदी करीत असलेल्या मालमत्तेची अधिकृत कागदपत्रे. त्यात घराचा, प्लॉटचा मालकी हक्क, सॅंक्शन लेआऊट, बिल्डरने घेतलेली बांधकाम परवानगी, कम्प्लिशन सर्टिफिकेट, शासकीय कर भरल्याची पावती अशी खरेदीशी निगडित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासली पाहिजेत.
* तुम्ही ज्या शहरात आहात तिथल्या नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांमध्ये घर घेण्यास प्राधान्य द्यायला हवे. त्यासाठी स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करा. त्या परिसरातील गृहप्रकल्प, घरांच्या किमती, घरभाडे किंवा विक्रीदर कसे आहेत, हेही पाहून घ्या.
* घराची निवड करताना ते कोणत्या लोकेशनवर आहे, याचाही विचार करायला हवा. जेणेकरून तुमचे जीवन आनंदी आणि सुसह्य होईल. प्रवासात जाणारा वेळही वाचेल आणि पैशाचीही बचत होईल.
* सर्वात आधी तुमची आवडनिवड काय आहे, हे तपासून बघा. तुमच्या दैनंदिन जीवनशैलीचा विचार करा. तुम्हाला शांत वातावरण हवे आहे की शहराच्या मध्यभागी राहणे आवडते, त्यानुसार पुढचा निर्णय घ्या.
* घर खरेदी करताना सोयीसुविधा बघणे अत्यंत आवश्यक आहे. मुलामुलींच्या शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बाजारपेठ, वाहतूक सुविधा, मनोरंजन केंद्र तुमच्या घराजवळ किंवा परिसरात आहे का, हेही तपासा.
घर खरेदी करताना वरील सर्व गोष्टींचा विचार करून काळजीपूर्वक निर्णय घ्या. घराविषयी तुम्ही बाळगलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण होत असतील तरच घराची खरेदी करा. सर्व दृष्टीने परिपूर्ण, मजबूत आणि आकर्षक गृहखरेदीसाठी आजच श्लोक रिअल्टीजच्या गृहप्रकल्पांना सहकुटुंब भेट द्या. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा –